केंद्र सरकार सहा महिन्यांत इथेनॉल पंपांचे नेटवर्क उभारणार

नवी दिल्ली : भारत सरकार गेल्या अनेक दिवसांपासून पर्यायी इंधनाच्या प्रश्र्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी इथेनॉल हे पर्यायी इंधन आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉल वापराला प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी ऑटो उद्योगाला फ्लेक्स फ्यूएल इंजिनसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. फ्लेक्स फ्यूएल इंजिन पेट्रोल आणि इथेनॉल या दोन्हीवर चालू शकते ‌ याशिवाय इथेनॉल मिश्रीत पेट्रोल शुद्ध पेट्रोल अथवा डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषणकारी मानले जाते. अलिकडे सियाम अॅन्युअल कन्व्हेंशनलमध्ये गडकरी यांनी सांगितले की सरकार आगामी सहा महिन्यांत देशभरात इथेनॉल पंपांचे नेटवर्क उभारण्याचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करीत आहे.

गडकरी यांनी ऑटो उद्योगातील हितधारकांना आश्वासन दिले की सरकारने पूर्ण देशात इथेनॉल उपलब्ध होईल याची दक्षता घेईल. भारताने २०२२ पर्यंत ई १० आणि २०२५ पर्यंत ई २० असे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल पूर्ण देशात उपलब्ध होईल. यासोबतच २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. गडकरी यांनी सांगितले की ई १०० आगामी इथेनॉल इंधन स्टेशन्सवर मिळणार आहे. या इथेनॉल इंधन भरणाऱ्या पंपांचे व्यवस्थापन सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांकडेच असेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here