साथा कारखान्याच्या क्षमता वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

अलीगड : अलीगड जिल्ह्यातील एकमेव सहकारी साखर कारखान्याची क्षमता वाढविण्यासह डिस्टीलरी युनिट, इथेनॉल प्लांट तथा पॉवर प्लांट सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सतर्क असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव संजय प्रसाद यांनी ऊस विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून अहवाल मागविला आहे.

आमदार दलवीर सिंह, अनिल पाराशर, संजीव राजा, राजकुमार सहयोगी, अनुप प्रधान, रवेंद्र पाल सिंह, खासदार सतीश गौतम, राजवीर सिंह, राजू भय्या तथा रघुराज सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे साथा साखर कारखान्यांची क्षमता वाढविण्याची मागणी केली होती. लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते. साथा साखर कारखान्याची गाळप क्षमता १२५० टीसीडी आहे. केंद्र सरकारने अशा १२५० टीसीडी क्षमतेच्या साखर कारखान्यांना फायदेशीर युनिट म्हटलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना तोट्यात सुरू आहे. कारखान्याची गाळप क्षमता अत्यंत कमी असल्याने तसेच यंत्रसामुग्री जीर्ण झाल्याने कारखाना चांगला चालत नाही. गेल्या दहा वर्षांपासून कारखान्यातील कोणतीही यंत्रसामुग्री बदलली नसल्याचे लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here