मुख्यमंत्र्यांनी दिले ऊस दरवाढीचे आश्वासन

89

लक्सर : लक्सरच्या भाजप आमदारांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेऊन ऊस दर वाढविण्याची मागणी केली. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशपेक्षा अधिक ऊस दर दिला जाईल असे आश्वासन दिल्याचे आमदारांनी सांगितले. यासोबतच त्यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनी लक्सर भाजपचे आमदार संजय गुप्ता यांना भेटून आपल्या अडचणी मांडल्या. गेल्या चार वर्षांत सरकारने ऊस दरात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. या कालावधीत डिझेलचे दर दुप्पट झाले आहेत. किटकनाशके, खते आणि औषधे यांचे दरही दोन ते तीन पटींनी वाढले आहेत. मजुरीही तिप्पट झाली आहे. त्यामुळे या वर्षी ऊसाच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर आमदारांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

आमदार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री धामी यांनी ऊसाच्या खरेदी दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय आमदारांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून दुसऱ्यांची सेवी करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांच्या समस्याही मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. आमदारांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्याचेही आश्वासन दिले आहे. लवकरात लवकर मुख्यमंत्री शासन आदेश जारी करतील असे आमदार गुप्ता म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here