देशात १५ फेब्रुवारीपर्यंत २०८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन

नवी दिल्ली : देशातील साखर कारखान्यांनी १५ फेब्रुवारीअखेर २०८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १७०.०१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यापूर्वीच्या २०२०-२१ या हंगामात गाळप सुरू करणाऱ्या ४९७ साखर कारखान्यांपैकी ३३ साखर कारखान्यांचे गाळप कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने बंद झाले आहे. गेल्यावर्षी ४४७ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू केले होते. त्यापैकी २० साखर कारखाने या कालावधीत बंद झाले होते.
महाराष्ट्रात १५ फेब्रुवारी अखेर १८३ साखर कारखाने गाळप करीत आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत उत्पादित ४३.३८ लाख टन साखरेच्या तुलनेत यंदा ७५.४६ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. यावर्षी दोन साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. गेल्यावर्षी १४० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. त्यापैकी पाच साखर कारखान्यांचे गाळप याच कालावधीत बंद झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये सद्यस्थितीत ११६ साखर कारखाने सुरू आहेत. तर चार कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी १५ फेब्रुवारीअखेर ६५.१३ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ११९ साखर कारखान्यांनी ६६.३४ लाख टन साखेरचे उत्पादन केले होते.

कर्नाटकमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत ६६ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. गेल्यावर्षी याच कालावधीत ६३ साखर कारखान्यांनी ३०.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर यंदा ३९.०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात गाळप करणाऱ्या ६६ साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनी १५ फेब्रुवारीला गाळप बंद केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधी ६३ कारखाने सुरू होते. त्यापैकी १३ साखर कारखाने याच कालावधीत बंद झाले होते.
गुजरातमधील १५ साखर कारखान्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत ६.५५ लाख टन साखेरेच उत्पादन केले. तर गेल्यावर्षी १५ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी याच कालावधीत ५.५९ लाख टन साखरेचे उत्पादन केले.

तमीळनाडूमध्ये २५ साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात गाळप सुरू केले असून २.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत २१ साखर कारखान्यांनी २.६३ लाख टन साखेरेच उत्पादन केले होते. उर्वरीत आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिसा या राज्यांत पंधरा फेब्रुवारीपर्यंत एकूण २०.४३ लाख टन साखेरेच उत्पादन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here