देशातील ऊस बिल थकबाकी २२,९०० कोटींवर

नवी दिल्ली : देशातील साखर कारखान्यांकडील ऊस बिलाची थकबाकी १९.२७ टक्क्यांनी वाढून २२ हजार ९०० कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. साखरेचे दर कमी असल्याने कारखान्याच्या आर्थिक तरलतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊस बिलांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देणे आणि महसूल सुधारणेसाठी सरकार साखरेच्या किमान विक्री किंमतीत (एमएसपी) वाढ करेल अशी अपेक्षा आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) सांगितले की, एमएसपीत वाढ केल्यास सध्याच्या ऊस थकबाकीचा प्रश्न हाताळणे सोपे होईल. अन्यथा स्थिती बिघडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऊसाची थकबाकी आणखी गंभीर स्थितीवर पोहोचू शकते.

सरकारी आकडेवारीचा आधार घेत इस्माने सांगितले की, यावर्षी उसाची थकबाकी गेल्यावर्षीच्या १९ हजार २०० कोटी रुपयांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. गेल्या काही महिन्यांपासून साखरेचा दर कमी असल्याने कारखान्यांना आर्थिक तरलता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देणे यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here