बिजनौर: पाच साखर कारखान्यांचे गाळप याच महिन्यात होणार

बिजनौर : जिल्ह्यातील पाच साखर कारखाने याच महिन्यात ऊसाचे गाळप सुरू करणार आहेत. चार कारखान्यांनी गाळपाबाबतचे इंडेंटही जारी केले आहे. उर्वरीत कारखाने महिना अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू करतील. कारखाने सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने साखर कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कारखान्यांनी याची तयारीही केली होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कारखान्यांचे बॉयलर पूजन सुरू करण्यात आले होते. कारखान्यांनी गाळपाचा संभाव्य तारीखही जाहीर केली होती. मात्र, तीन दिवसांच्या पावसाने या तयारीवर पाणी पडले.
साधारणतः एक क्विंटल उसापासून ११ ते १३ किलो साखर तयार होते. मात्र, पावसाने रिकव्हरी आठ टक्क्यांहून कमी झाली आहे. रिकव्हरी पाहता साखर कारखाने नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील बुंदकी, अफजलगड, बरकातपूर, धामपूर व स्योहारा हे पाच साखर कारखाने ऑक्टोबरपासून गाळप करणार आहेत. यामध्ये अफजलगड, बुंदकी, बररकातपूर आणि धामपूर कारखाने २९ ऑक्टोबरला गाळप सुरू करतील. या कारखान्यांनी ऊस खरेदी केंद्रांसाठी २७ व २८ ऑक्टोबरचे इंडेंट जारी केला आहे. स्योहारा कारखाना ३० ऑक्टोबरला गाळप सुरू करेल. अफजलगड कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक अजय ढाका यांनी सागितले की, सध्या साखर उतारा कमी येत आहे. मात्र शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी गाळप केले जात आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, पाच कारखाने याच महिन्यात गाळप सुरू करतील. त्यानंतर उर्वरीत कारखान्यांनीही लवकर गाळप सुरू करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here