मंसुरपूर, उत्तर प्रदेश: साखर कारखान्याचा गाळप हंगाम ऑक्टोबर पासून सुरु होईल. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ऊस खरेदी केंद्रांवर वजन काटे लावण्याचे कार्य सुरु आहे. मंसूरपूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दिक्षित यांनी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाबाबत माहिती देताना सांगितले की, साखर कारखान्याचा गाळप हंगाम 25 ऑक्टोबर पासून सुरु केला जाईल. साखर कारखान्यामध्ये मशीन दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी ऊस खरेदी केंद्रांवर वजन काटे लावण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्रांवर वजन काटे पाठवण्यापूर्वी पूजन करण्यात आले. यावेळी ऊस महाव्यवस्थापक बलधारी सिंह, फॅक्टरी मॅनेजर रविंद्र कुमार शर्मा, मुनेश कुमार, दिनेश कुमार, अखिलेश तिवारी, संजीव कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.