महाराष्ट्रात ५४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

129

पुणे : महाराष्ट्रातील जवळपास ५४ साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामातील ऊस गाळपास सुरुवात केली आहे. एक नोव्हेंबरपर्यंत १३.३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. एकूण १८.३५ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार, ज्या कारखान्यांनी गेल्या हंगामात शेतकऱ्यांना ऊस गाळपानंतर एफआरपीची रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाकडून गाळप परवाना मिळवण्यात अडचणी आल्या आहेत. दरम्यान शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पुणे आणि कोल्हापूर विभागात ३० साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. नागपूर विभागात अद्याप कोणत्याच कारखान्याने गाळप सुरू केलेले नाही. तर अमरावती विभागात एक कारखाना सुरू झाला आहे. एक नोव्हेंबरपर्यंत राज्यात ३१ सहकारी आणि २३ खासगी कारखाने सुरू झाले आहेत.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, कारखानदारांकडून थकीत एफआरपी देण्याआधीच गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या हंगामात १९० कारखान्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १५४ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here