21 ऑक्टोबरपासून सुरु होणार धामपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम

धामपूर : धामपुर साखर कारखान्याचा गाळप हंगाम 21 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. साखर कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम सुरु करण्याची पूर्ण तयारी केली आहे. मशीनची दुरुस्ती केली जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामीण क्षेत्रामद्ये ऊस खरेदी केंद्र स्थापन करण्याचे काम सुरु केले जाईल.

धामपूर साखर कारखान्याचे ऊस जीएम कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, आगामी गाळप हंगाम 21 ऑक्टोबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 49,750 हेक्टर क्षेत्रामध्यें ऊसाची लागवड करण्यात आली होती. जी यावेळी वाढून 50 हजार हेक्टर पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास तीन टक्के ऊस क्षेत्रफळामध्ये फायदा झाला आहे. शेतकर्‍यांनी अधिक उत्पादन घेण्याच्या हेतूने 0238 जातीच्या ऊसाची लागवड अधिक केली आहे. भागातील जवळपास 70 हजारापेक्षा अधिक शेतकरी धामपूर साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा करतात. सध्या साखर कारखान्याकडून शरदकालीन ऊसाची लागवड केली जात आहे. जवळपास 1000 हेक्टर क्षेत्रफळामध्ये लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत 100 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाच्या लागवडीचे काम करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड ट्रेंच पद्धतीने 5 फुटाच्या अंतराने करावी. यामुळे शेतकरी ऊसाचे अधिक उत्पादन घेवू शकतील, तसेच आंतरपीक शेतीचाही फायदा घेवू शकतील. आगामी हंगामासाठी धामपूर साखर कारखाना क्षेत्रामध्ये 207 वजन केंद्र स्थापन करतील असे ते म्हणाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here