सोलापूर विभागातील कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात

13

पुणे : चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२१ पर्यंत १८९ साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यात ९७९.०६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. एकुण १०२४.८३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के आहे.

आतापर्यंत राज्यात १११ साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात सर्वात जास्त ४३ कारखान्यांनी ७ एप्रिल अखेर गाळप बंद केले आहे. विभागात १७५.६६ लाख टन ऊस गाळप झाले असून १६४.६४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागात ३१ साखर कारखाने, नांदेड विभागात १३, पुणे विभागात १२, अहमदनगर विभागात ७ तसेच औरंगाबाद आणि नागपूर विभागात प्रत्येकी एक साखर कारखाना बंद झाला आहे.

Previous articleShivraj Singh Chouhan announces weekend lockdown in urban areas of MP
Next articleપાકિસ્તાન: શેરડીના બાકી નાણાંની ચુકવણીની માંગ સામે ખેડુતોનો વિરોધ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here