हवन पूजन करुन कुंभी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

147

अमीरनगर, उत्तर प्रदेश: बलरामपुर ग्रुपच्या कुंभी साखर कारखान्याचा नवीन गाळप हंगाम 2020-21 सोमवारी हवन आणि पूजन करून सुरु करण्यात आला. कारखाना व्यवस्थापनाने डोंगे मध्ये ऊस घालून गाळपाला सुरुवात केली. साखर कारखान्यामध्ये ऊस घेऊन आलेल्या गंगापूर ग्रंट येथील छोटेलाल यांच्या बैलगाडीचे वजन करण्यात आले. दुसरी ट्रॉली कुंभी येथील शेतकरी ठाकुर सुखपाल सिंह यांच्या ऊसाचेही वजन करण्यात आले. साखर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. सुनील कुमार यादव यांनी दोन्ही शेतकऱ्यांना सन्मानित केले. कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक वाणिज्य मुकेश मिश्रा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ऊस महाव्यवस्थापक आर एस ढाका यांनी शेतकऱ्यांना चांगला स्वच्छ ऊस आणण्याची विनंती केली. यावेळी चौकी प्रभारी लल्ला गोस्वामी, सत्येंद्र सिंह, रविंद्र शुक्ला, प्रशांत चौधरी, एके सिंह, आरएन दीक्षित सहित कारखाना व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यकतै उपस्थित होत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here