पुरनपूर कारखान्याचा आजपासून गळीत हंगाम प्रारंभ

पिलीभीत : आमदार बाबूराम पासवान आज गव्हाणी पूजन करून साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ करतील. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुरनपूर सहकारी ऊस समितीने शेतकऱ्यांना एसएमएस करून तोडणी पावत्या पाठविण्यास सुरुवात केल्या आहेत. एलएच साखर कारखान्याने एक नोव्हेंबरपासून गाळप सुरू केले आहे.

पुरनपूर किसान सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ आमदार बाबूराम पासवान यांच्या हस्ते होईल. कारखान्याच्या कामगारांनी त्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना तोडणी पावत्या देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या प्रारंभासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. आमदार आज पूजन करून गळीत हंगामाच्या सत्रास आरंभ करतील. तोडणी पावती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला ऊस तोडावा. आधीच उसाची तोडणी झाली तर कारखाना आणि शेतकरी अशा दोघांचेही नुकसान होते. याशिवाय शेतकऱ्यांना साफ ऊस कारखान्याला पाठवावा. जिल्हाधिकारी पुलकीत खरे यांच्यासह अधिकारी, शेतकरी गाळप हंगाम प्रारंभ प्रसंगी उपस्थित राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here