सींभावली साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात

128

गढमुक्तेश्‍वर, उत्तर प्रदेश: सींभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम विधिवत पूजनासह सुरु झाला. कारखान्याचे संचालक गुरुसिमरन कौर यांनी कारखान्याच्या नव्या हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी कारखाना कर्मचारी, ऊस समितीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. सींभावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम बुधवारी विधिवत पूजन आणि अखंड पाठ करुन सुरु झाला. याच्यानंतर साखर कारखान्याचे संचालक गुरुसिमरन कौर यांनी कारखान्याच्या गव्हाणीत ऊस घालून गाळप सुरु केले.

यावेळी कारखान्याचे सीजीएम करन सिंह, मुख्य ऊस व्यवस्थापक अमानुल्ला खान, ऊस समिती सचिव राकेश पटेल, ज्येष्ठ ऊस निरीक्षक अशोक कुमार यादव, भाकियू नेता सतवीर चौधरी, धनवीर शास्त्री आदी उपस्थित होते.
गुरसिमरन कौर यांनी दावा केला की, शेतकर्‍यांना त्यांचे पैसे लवकरच दिले जातील. तर सध्या गाळप हंगामात खरेदी करण्यात येणार्‍या ऊसाचे पैसेही ठरलेल्या वेळेत दिले जातील. त्यानीं सांगितले की, सींभावली साखर कारखाना नेहमीच भागातील शेतकर्‍यांच्या हितार्थ काम करत आहे, आम्ही शेतकर्‍यांचे सुख दु:ख समजून घेतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here