जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरपासून

बदायूँ : साखर कारखाने नव्या हंगामाच्या ऊस गाळपाची तयारी करीत आहेत. या दिवसांत कारखान्यांच्या देखभालीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांतील मेंटेनन्सचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले आहे. साखर कारखान्यांच्या सरव्यवस्थापकांनी कारखाना सुरू करण्याची तारीख जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवली आहे.

दि किसान सहकारी साखर कारखाना शेखूपूरमध्ये ६२ टक्के तर बिसौलीच्या यदू शुगर मिलमध्ये ७५ टक्के मेंटेनन्सचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. साठ टक्क्यांवर मेन्टेनन्सचे काम पूर्ण झाल्यानंतर सर व्यवस्थापकांनी कारखाना सुरू करण्याच्या संभाव्य तारखेची घोषणा केली आहे. दि किसान सहकारी साखर कारखाना शेखूपूर नऊ नोव्हेंबरपासून ऊसाचे गाळप सुरू करेल. तर बिसौलीचा यदू साखर कारखान्याचे गाळप १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राणा शुगर मिल २८ ऑक्टोबरतर रजपुरा कारखाना २० ऑक्टोबरपासून गाळप सुरू करेल.

जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या मेन्टेनन्सची पाहणी केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन यांनी सांगितले की, कारखान्यांच्या देखभालीचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले आहे. जिल्ह्यातील दोन्ही कारखाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गाळप सुरू करतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here