नरकटियागंज साखर कारखान्यामध्ये डोंगा पूजनासह उस गाळप हंगाम सुरु

नरकटियागंज, बिहार: नरकटियागंज साखर कारखान्यामध्ये शनिवारी वैदिक मंत्रोच्चारा दरम्यान डोंगा पूजन करण्यात आले. डोंगा पूजनानंतर गाळप हंगामाची सुरुवात झाली. न्यू स्वदेशी साखर कारखान्याचे कार्यपालक अध्यक्ष चंद्रमोहन यांनी डोंगा पूजनानंतर उसाबाबत सर्वात पहिल्यांदा बैलागाडी घेवून आलेल्या मोर बेलवा गावातील जंगबहादुर यादव, ट्रॅक्टर घेवून आलेले टिंकू महतो यांना रोख रक्कम तसेच कांबळे देवून सन्मानित केले. कार्यपालक उपाध्यक्ष मनोज सिंह, आईटी हेड रजनीश सिंह, उस व्यवस्थापक संजीव कुमार झा, राजेश पांड्ये, विपिन दूबे, विनोद पांड्ये, मनोज मिश्र, संतोष कुमार एस, महेश राय, रंगनाथ जोशी, जीत बहादुर सिंह आदी उपस्थित होते.

कार्यपालक अध्यक्ष चंद्रमोहन यांनी सांगितले की, यावर्षी 1.05 करोड क्विंटल उस गाळपाचे लक्ष्य निश्‍चित आहे, जे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल. राज्यसभा खासदार सतीश चंद्र दुबे, बगहा आमदार राम सिंह, वीपीसीडी कुलदीप ढाका, वीपी केन प्रमोद गुप्ता, माजी आमदार विनय शर्मा, आशीष वर्मा उर्फ मधू बाबू, शैलेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here