ऊस शेतकर्‍यांच्या मोबाइलवर अपलोड केले जाईल दामिनी अ‍ॅप

हरदोई: पावसाच्या वेळी शेतांवर काम करणारे शेतकरी आकाशीय विजेच्या तडाख्यात सापडून आपला जिव गमावतात. आता ऊस विभाग या शेतकर्‍यांना वाचवण्याचे अभियान चालवून त्यांना अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये दामिनी अ‍ॅप अपलोड करेल. यासाठी प्रदेशाचे ऊस आयुक्त यांनी जिल्हा ऊस अधिकारी यांना एडवाइजरी जारी केली.

जिल्हा ऊस अधिकारी शना अफरीन यांनी सांगितले की, दामिनी लाइटिंग अलर्ट मोबाईल अ‍ॅप ला इंडियन इन्स्टीस्टयूट ऑप ट्रॉपिकल मैट्रोलॉजी पुणे यांच्याकडून विकसित करण्यात आले आहे. हे मोबईल अ‍ॅप गुगल स्टोर वर मोफत आहे. ते म्हणाले, हे अ‍ॅप वापरणार्‍याच्या लोकेशनच्या अनुसार त्या स्थानापासून 20 किलोमीटरच्या जवळपास आकाशीय विज पडण्याचा इशारा मोबाईल ऑडियो संदशाद्वारा देतो आणि एसएमएस च्या माध्यमातून अलर्ट करतो. ज्यामुळे शेतकरी वेळेत सुरक्षित स्थळी पोहचू शकतील. जिल्हा ऊस अधिकारी यांनी सांगितले की, आकाशीय विज पडण्यापासून वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी खुल्या शेतात, झाडाच्या खाली उभे राहू नयेत. पावसाच्या वेळी विज पडण्याच्या दरम्यान जमिनीवर सपाट झोपावे. शेतकर्‍यांनी विज पडण्यापूर्वी तलाव, ओढा आणि वीजेचे संचालन करणार्‍या वस्तूंपासून दूर रहावे आणि त्या दरम्यान धातूंची भांडी धुवू नयेत आणि आंघोळही करु नये. ते म्हणाले ऊस विभागचे कर्मचारी ऊस शेतकर्‍यांच्या अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये दामिनी अ‍ॅप अपलोड करतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here