तो दिवस दूर नाही जेव्हा बाईक, ऑटो रिक्षा, कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील : नितीन गडकरी

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, त्यांच्या आग्रहानंतर हिरो, बजाज आणि टीव्हीएससारख्या दुचाकी वाह कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनच्या बाईकची निर्मिती केली आहे. या बाईक फ्लेक्स इंजिनीवर पेट्रोलियम आणि पर्यायी इंधन अशा दोन्हीवर चालतात. दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ते म्हणाले की तो दिवस दूर नाही, जेव्हा बाईक, ऑटो रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील. लवकरच ठिकठिकाणी इथेनॉलचे पंप असतील.

ते म्हणाले की, टोयाटोने एक्स्पोमध्ये आपल्या १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे मॉडेल आणले. आणि लवकरच बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ह्युंदाई आणि मारुती-सुजुकी यांसारख्या इतर ब्रँडकडून जैव इंधनावरील कारचे मॉडेल लाँच केले जाण्याची अपेक्षा आहे. समारंभाच्या मुख्य अतिथीच्या रुपात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह होते.

हायड्रोजन कार आपल्याजवळ असल्याचा दावा करणाऱ्या गडकरी यांनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेतून हायड्रोजनवर चालणारी ऑटो रिक्षाही आयात केली आहे. ती सध्या सीमा शुल्क विभागाकडे आहे. जैव इंधनाचे प्रबळ समर्थक गडकरी यांनी सांगितले की, या क्षेत्रात जैव सीएनजी प्लांट बसविण्यात येणार आहे. त्यांनी इतरांनाही अशा प्रकारच्या उद्योगासाठी प्रोत्साहित केले आहे. ते म्हणाले की, आयओसीद्वारे बनविण्यात आलेल्या बायो-बिटूमेन आणि इथेनॉलपासून दिल्लीत पाचट जाळल्याने होणारे प्रदूषणही रोखण्यास मदत मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here