गुळाची मागणी घटल्याने छोट्या युनिट्सवर मोठा परिणाम

इरोड : पोंगलच्या सणाला जेमतेम एक महिना शिल्लक आहे. अशातच जिल्ह्यातील गूळ उत्पादच मोठ्या चिंतेत आहेत. चांगल्या गुणवत्तेच्या गुणाची मागणी कमी झाली आहे. जिल्ह्यातील मुल्लमपरप्पू, अरचलूर, कवुंदापदी आणि अम्मापेट्टाई या विभागात गुळाचे उत्पादन करणारी १०० पेक्षा जास्त छोटी युनिट्स आहेत. ही युनिट्स पोंगल सणाच्या आसपास दोन आठवड्यात सुरू होतात आणि वर्षभर चालू असतात.

पोंगल सणासाठी उसापासून तयार झालेला गूळ अथवा ‘वेल्लम’ ही एक आवश्यक वस्तू आहे. गुळ उत्पादकांनी दावा केली की, पोंगलचा सण आता आमच्यासाठी गोड राहिलेला नाही. ते म्हणाले की, मागणीत झालेली घट, मजुरीमध्ये झालेली वाढ, गुळाच्या किमतीमधील घट आणि बनावटगिरी हे चिंतेचे विषय आहेत. त्यामुळे अनेक युनिट्सना नाईलाजास्ताव आपले कामकाज बंद करावे लागले आहे. गेल्या वर्षी ३० किलो वजनाची गुळाची एक ढेप १,२५० रुपयांना विक्री केली जात होती. मात्र, यंदा व्यापारी १,११० रुपये प्रती ढेप गुळ मागत आहेत. ऊसाचा उत्पदन खर्च प्रती टन २,३०० रुपये आहे. तर तोडणी, वाहतूक खर्च असा २००० रुपये वाढतो. बाजारात भेसळयुक्त गूळ कमी किमतीत उपलब्ध असून, त्याचा थेट परिणाम गूळ युनिटवर होत आहे, असे उत्पादकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here