नवी दिल्ली : नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांच्या पथकाने डेल्टा व्हेरियंट बी १.६१७.२ बाबत नवे संशोधन केले आहे. त्यानुसार असे आढळून आले आहे की, कोरोनाचा डेल्टा बी १.६१७.२ हा व्हेरियंट अल्फाच्या तुलनेत अधिक घातक आहे. डेल्टा व्हेरियंट अल्फाच्या तुलनेत ४० ते ६० टक्के अधिक गतीने फैलावतो. तर लसीकरणाबाबत आयसीएमारने केलेल्या ताज्या संशोधनात आढळून आले आहे की, सध्या दिली जाणारी कोरोना विरोधी लस डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी आहे.
संशोधकांनुसार जर अधिक लोकांनी लसीकरण करुन घेतले तर कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटवर मात करता येते. याबाबत डॉ. अरोरा यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरियंटमुळे होणाऱ्या आजारांपैकी कोणता आजार गंभीर आहे हे सांगणे कठीण आहे. ऑक्सफर्ड एक्स्ट्राजेनेकाचे दोन डोस कोरोनाच्या बी. १.६१७.२ या व्हेरीयंटचे संक्रमण रोखण्यासाठी ८० टक्के प्रभावी आहे. युकेतील एका संशोधनातून ही बाब लक्षात आली आहे. ऑक्सफर्ड एक्स्ट्राजेनेकाची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डच्या रुपात तयार केली जात आहे. सध्या भारतात अठरा वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. या व्हेरियंटचा धोका लहान मुले, ज्येष्ठ व्यक्तींना अधिक आहे. मुलांची खूप काळजी घ्यावी लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे बाहेर जाताना सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link