ऊस विभाग गाळप हंगाम सुरु करण्याच्या तयारीत

172

सहारनपूर, उत्तर प्रदेश: ऊस विभागाने 27 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सु़रु करण्याच्या हालचाली जोरात सुरु केल्या आहेत. यामुळे जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी साखर कारखान्यांचे निरीक्षण करुन दुरुस्तीच्या स्थितीची पाहणी केली आणि 15 ऑक्टोबर पर्यंत मेंटेनन्स पूर्ण करण्याचे निदर्शे दिले. ऊस सुरक्षणासाठी सर्व समित्यांकडून प्रस्ताव मागण्यात आले आहेत. लखनउ मध्ये होणार्‍या सुरक्षण बैठक़ीत ऊस खरेदी केंद्र आणि ऊस वाटपाला अंतिम रुप दिले जाईल.

ऊस विभाग 27 ऑक्टोबर पासून नव्या गाळप हंगामाच्या तयारीत आहे. याबाबत डीसीओ सातत्याने कारखान्यांमध्ये सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाचे निरीक्षण करत आहेत. गुरुवारी ही जिल्हा ऊस अधिकार्‍यांनी नानौता साखर कारखान्याचे निरीक्षण केले, तर बुधवारी त्यांनी सरसावा साखर कारखान्याचे निरीक्षण केले होते. सरसावा कारखाना व्यवस्थापकांनी डीसीओ ना सांगितले की, 17 ऑक्टोबरपर्यंत तीनही बॉयलर तयार होतील. कारखाना 25 ऑक्टोबर पर्यंत सुरु होण्यासाठी तयारी होईल. नानौता कारखान्याच्या व्यवसथापनाने डीसीओना सांगितले की, बॉयलर चे काम 24 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल. मिल हाऊस ची ट्यूब गुजरात मधून 30 ऑक्टोबरपर्यंत येईल. यावर डीसीओ यांनी मेंटेनन्स कार्यात गती आणून कारखान्याला 27 ऑक्टोबर पर्यंत चालवण्याचे निर्देश दिले. जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, सर्व कारखान्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत मेंटेनन्स चे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दुरुस्तीच्या कार्यामध्ये मागे राहिलेल्या साखर कारखान्यांनी या कामात गती घ्यावी असे सांगण्यात आले आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु होण्यासाठी ऊस विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here