‘कॉफको इंटरनॅशनल’च्या तज्ज्ञांनी दिली जकराया कारखान्याला भेट

सोलापूर : गेल्या अनेक वर्षापासून कॉफको इंटरनॅशनल या जगातील साखर व्यापार आणि साखर उत्पादनात अग्रगण्य अशा कंपनीसोबत कार्यरत ब्राझील येथील फर्नांडो रिबेरो आणि प्रमोद कुटे (मुंबई) यांनी जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांची भेट घेऊन साखर उद्योगाबाबत चर्चा केली. रिबेरो आणि कुटे साखरेच्या जागतिक मार्केटचे तज्ज्ञ आहेत. दोघेही ‘कॉफको’च्या माध्यमातून जागतिक साखरेच्या मार्केटचा अभ्यास आणि संशोधन करत असतात.

रिबेरो आणि कुटे यांनी नुकताच ब्राझील आणि थायलंडचा अभ्यास दौरा केला आहे. ते सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ब्राझीलमध्ये कॉफको कंपनीचे चार साखर कारखाने आहेत. ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्येही काही कारखाने आहेत. ब्राझीलमध्ये नुकत्याच संपलेल्या वर्षात कॉफकोच्या चार कारखान्यांनी १८५ लाख मे.टन ऊस गाळप करून १५ लाख मे. टन साखर, उर्वरित इथेनॉल उत्पादन केले आहे. जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांची भेट घेऊन दोघांनी साखर उद्योगासमोरील आव्हाने या विषयावर सविस्तर चर्चा केली. जकराया शुगरने यंदाच्या गळीत हंगामात उसाच्या रसापासून इथेनॉल ऐवजी बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतला. जकराया कारखान्याच्या व्यवस्थापन कौशल्याचे या अभ्यासकांनी कौतुक केले. सचिन जाधव यांनी दोघांचा सत्कार केला. जकराया शुगरचे पूर्णवेळ संचालक राहुल जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here