साखर विक्रीसाठी कारखान्याने उघडले रिटेल शॉप

बिजनौर : जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी नजीबाबाद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी, कर्जमुक्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. साखरेच्या स्टॉकची विक्री करण्यासाठी रिटेल शॉप सुरू करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, की, जिल्ह्यातील हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी गोदामांमध्ये साठवणूक केलेल्या साखर विक्रीसाठी प्रयत्न करावेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिल्या. गोदामातील साखर विक्रीतून साठवणुकीवरचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांना ऊस दर वेळेवर दिले गेले पाहिजे. कारखान्याचे व्यवस्थापकांनी सांगितले की, कारखान्याने २७ जानेवारी २०२२ पर्यंतची ऊस बिले दिली पाहिजेत. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पीएफ अपडेट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पेयजलाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी कारखाना व्यवस्थापक सुखबीर सिंह, उपाध्यक्ष धीरेंद्र सिंह, डायरेक्टर सुरजीत सिंह, रफअत हुसैन, लोकेंद्र सिंह, सुनील कुमार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here