बुलंदशहर : साबितगढ येथील त्रिवेणी साखर कारखान्याने दहा एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांना १०० टक्के बिले अदा केली आहेत. याशिवाय गरजू शेतकऱ्यांना अनुदानावर ऊसाचे बियाणे, औषधेही उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी सज्जन पाल सिंह यांनी सांगितले की, गेल्यावेळच्या शेतकऱ्यांचे हाल पाहून यावर्षी कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्यात आला. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी जवळपास ३२० कोटी ४५ लाख ३३ हजार रुपयांची ऊस बिले कारखान्याने अदा केली आहेत. साबितगढ साखर कारखान्याकडून झालेल्या या ऊस बिलांच्या प्रक्रियेमुळे शेतकरी सुखावले आहेत. त्वरीत ऊस बिले मिळाल्याने शेतकऱ्यांना आपल्या मुलांचे शिक्षण, विवाह कार्यक्रम आदींना मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाचे कौतुक केले आहे. यासोबतच उसाचे चांगले बियाणे, खते, औषधे अनुदानावर दिली जात असल्याने कारखान्याबद्दल आनंदाची भावना आहे.