साखर कारखान्यामध्ये सतत गाळप ठप्प झाल्याने शेतकर्‍यांनी केला गोंधळ

कायमगंज, उत्तर प्रदेश: 24 तासामध्ये तीन वेळा गाळप बंद झाल्याने साखर कारखान्यामध्ये उस पुरवठा करणारे शेतकरी संतापले. ते गोंधळ करुन बॉयलर जवळ आले. तिथे उपस्थित गार्ड आणि सीसीओ यांनी शेतकर्‍यांना समजावून जीएम यांच्याशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. शेतकर्‍यांनी सांगितले की, त्यांनी उसाचे वजन करण्यासाठी तीन चार दिवस प्रतिक्षा करु शकणार नाहीत.

गुरुवारी रात्री साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये प्रेेशन न आल्याने गाळप बंद पडले होते. यानंतर कारखाना प्रशासनाने रात्री वाळलेले लाकूड आणि बगॅसची व्यवस्था करुन पुढच्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजपेर्यंत गाळप सुरु केले. यानंतर गाळप कसेतरी झाले. शनिवारपासून रविवारपर्यंत सतत तीन वेळा गाळप बंद झाले. रविवारी दुपारी पावणे दोन वाजता प्लांट पुन्हा बंद झाला. कारखाना गेटवर सर्व शेतकरी जमा झाले. सतत बंद होत असलेल्या गाळपामुळे ते संतप्त झाले. ते दंगा बॉयलरच्या आत आले. तिथे तैनात गार्डने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी जीएम यांना भेटण्याच्या हट्टाला पेटले. काही वेळानंतर तिथे सीसीओ प्रमोद कुमार यादव आले. त्यांनी शेतकर्‍यांना जीएम यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले आणि शेतकर्‍यांना तिथून बाहेर काढले.

शेतकरी शिवप्रताप सिंह, जितेंद्र यादव, शाहिद, अखिलेश, आशीष कुमार यांनी सांगितले की, ते लोक तीन चार दिवसांपासून इथे आहेत. कारखान्यामध्ये सतत गाळप बंद होत आहे. शेतीमध्ये असणारी अनेक कामे खोळंबली आहे. त्यांनी सांगितले होते की, आम्हाला स्पष्ट सांगावे की कारखाना सलग कधी सुीरु होणार आहे. म्हणजे त्यानुसार आम्ही उस घेवून येवू.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here