फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा ०.२५ टक्के व्याज दरवाढ

महागाईशी लढा देण्यासाठी फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा आपल्या धोरणात्मक दरात वाढ केली आहे. बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने २५ बेसिस पॉईंट्स अथवा ०.२५ टक्के वाढ केली आहे. या वाढीसह अमेरिकेमध्ये व्याज दर वाढून १६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. या वाढीबरोबरच आगामी काळात कोणतीही दरवाढ होणार नाही, अशी घोषणा फेड रिझर्व्हकडून करण्यात आली.

एबीपी लाइव्हने म्हटले आहे की, फेडरलच्यावतीने सलग दहाव्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. फेडरल ओपन मार्केट कमिटीने बुधवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, समिती येणाऱ्या सूचनांची पडताळणी करेल आणि आपल्या पतधोरणाच्या परिणामांचा आढावा घेईल. पॉलिसी मिटिंग नंतर फेड रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, बँकिंग सिस्टिम आता अधिक मजबूत आणि लवचिक बनविण्यात आला आहे. मात्र, फायनान्शिअल सिस्टिममधील उलथा-पालथीमुळे खर्च आणि वाढ दोन्हींची गती सुस्त होऊ शकते. फेड रिझर्व्हच्या या निर्णयाने कर्जे आणखी महागणार आहेत. सलग चौदा महिन्यांपासून दरात वाढ केल्यानंतर फेडरल रिझर्व्हचा व्याज दर आता ५ टक्क्यावरून ५.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. २००७ नंतर हा सर्वोच्च स्तर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here