आगीत बारा एकरातील गहू आणि ऊस भस्मसात

हापुड : असरा गावात अतिउच्च दाबाची विज वाहिनी तुटून सोमवारी एका शेतकऱ्यांचे सुमारे बारा एकरातील गहू आणि ऊस पिक भस्मसात झाले. शेतकऱ्यांनी विज वितरण कार्यालयाच्या दुर्लक्षाचा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आसरा येथील शेतकरी हरपाल, रोहताश, कृष्णा यांच्या शेतावरुन अतिउच्च दाबाची विज वाहिनी गेली आहे. विज वितरण वाहिनी जुनी असून त्यांच्या दुरुस्तीची मागणी यापूर्वी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सोमवारी अतिउच्च दाबाची वाहिनी तुटून गव्हाच्या शेतात पडली. त्यामध्ये सहा एकर ऊस आणि सहा एकर गहू जळाला. शिवाय तेथील भुश्याच्या साठ्यालाही आग लागली. ग्रामस्थांनी खूप प्रयत्न करून आगीवर मिळवले. शेतकऱ्यांनी विज मंडळाविरोधात आंदोलन केले आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी जयविंदर, गंगादास, धीरज, गणेश, सुखवीर, राजू, हरकेश, किशन, बिशन, भगवत, सोनवीर सिंह ऊर्फ सोनू आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here