एफएमसीजी उद्योग क्षेत्रात पुनरुज्जीवनाची चिन्हे

मुंबई : एफएमसीजीच्या क्षेत्रात पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे दिसत आहेत. टिकाऊ ब्रॅण्ड निर्माण केलेल्या, ग्राहकांची काळजी घेणार्‍या तसेच, नावीन्यपूर्ण व्यवसाय करणार्‍या कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांसारख्या एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना तसेच, नव्याने उदयास आलेल्या कंपन्यांना आर्थिक मरगळीशी सामना करावा लागला. मात्र हे अनुभव एफएमसीजी उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा अशावाद सीआयआयच्या एफएमसीजी राष्ट्रीय समितीचे प्रमुख आणि पीडिलाइट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक भरत पुरी यांनी व्यक्त केला.
भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) ’ग्रोथ वापसी: रिव्हायविंग अप एफएमसीजी ग्रोथ’ या राष्ट्रीय परिषदेमध्ये नोंदवण्यात आले. आर्थिक मरगळीला तोंड दिलेल्या एफएमसीजी क्षेत्रातील नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इतर काही प्रमुख कंपन्यांनी या परिषदेत अनुभव मांडले. यावेळी पुरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आर्थिक उदारीकरण झाल्यापासून एफएमसीजी क्षेत्राने भारताच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या क्षेत्राने सातत्याने दोन अंकी विकासदर कायम ठेवला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

SOURCEChinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here