नवी दिल्ली : जेव्हा कोरोना महामारीच्या कारणामुळे जग आव्हानांना तोंड देत होते, तेव्हा देशातील कृषी निर्यातीने उच्चांक गाठला. जेव्हा देश कोरोनामुळे बंद होता, तेव्हा भारतीय कृषी उत्पादनांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाणिज्य विभागाने भारताला जगातील अन्नधान्य पुरवठ्याचे भांडार बनविण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यामुळे कृषी निर्यात ५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी भारतातील पिक उत्पादन आणि निर्यात यांमध्ये समतोल नव्हता. शिवाय शेतकरी निर्यातयोग्य पिकांच्या उत्पादनाबाबत परिचित नव्हते. राज्यांकडून केवळ केंद्र सरकारकडे डोमेनरुपात निर्यात केली जात होती. राज्य सरकारांमध्ये कृषी निर्यातीच्या पायाभूत सुविधांमध्ये कमतरता होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. अतिरिक्त कृषी उत्पादनाच्या निर्यातीची माहिती दिली. सरकार कृषी आणि पायाभूत क्षेत्रांच्या मदतीला धावले. त्यामुळे निर्यात ५० बिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली. सरकारच्या प्रयत्नांनी २०२१-२२ मध्ये भारताने तांदळाची १० बिलियन अमेरिकन डॉलरची निर्यात केली. जगाच्या निर्यातीत हा ५० टक्के वाटा आहे. समुद्री उत्पादनांची ८ बिलियन अमेरिकन डॉलर, साखर ४.५ बिलियन अमेरिकन डॉलर, गहू २ बिलियन अमेरिकन डॉवर आणि कॉफी, मांस, डेअरी, पोल्ट्री उत्पाजनांची निर्यात करण्यात आली आहे.