नवी दिल्ली : चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखरेचे उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक होण्याची अपेक्षा आहे. सुधारीत अनुमानानुसार सध्याच्या साखर हंगामात गेल्यावर्षी २०२१-२२ मधील साखर उत्पादन २७८ एलएमटी अनुमानीत देशांतर्गत खपाच्या तुलनेत ३५० लाख मेट्रिक टन (एलएमटी) इथेनॉलसाठी ३५ एलएमटी साखर वळवल्यानंतर) होण्याची अपेक्षा आहे. साखर हंगामा २०२१-२२ च्या सुरुवातीला जवळपास ८५लाख मेट्रिक टन साखरेचा साठा होता.
जवळपास ९५ लाख मेट्रिक टन संभाव्य निर्यातीनंतर सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस चालू हंगामातील साखरेचा ६० लाख मेट्रिक टनाचा साठा असेल अशी शक्यता आहे. देशात साखरेची उपलब्धता देशांतर्गत गरजेची पूर्तता करण्यास सक्षम आहे. अशा स्थितीत साखर सहजपणे उपलब्ध होईल. आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती योग्य स्तरावर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
याबाबत केंद्र सरकारच्या खाद्य तथा सार्वजनिक वितरण-एफअँडपीडीचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या प्रधान सचिवांनी (साखर) आणि राज्य सरकारांच्या ऊस आयुक्त, संचालकांसोबत व्हर्च्युअल बैठक झाली. त्यामध्ये साखर हंगाम २०२१-२२ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊस शेतीच्या लागणीचे क्षेत्र, ऊस आणि साखर उत्पादनासोबत साखर निर्यात तसेच इथेनॉल उत्पादनासाठी गरजेच्या प्रमाणात साखर वळविण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली.
सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊसापासून पेट्रोलसोबत मिश्रणासाठी इथेनॉल बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातून केवळ हरित इंधनच उत्पादन होणार नाही तर कच्च्या तेलाच्या आयातीच्या कपातीमुळे परकीय चलनातही बचत होणार आहे. गेल्या तीन हंगामात २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये जवळपास ३.३७ एलएमटी, ९.२६ एलएमटी आणि २२ एलएमटी साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करण्यात आले आहे. सध्याच्या साखर हंगाम २०२१-२२ मध्ये जवळपास ३५ एमएलटी साखर इथेनॉलसाठी डायव्हर्ट होईल. तर २०२४-२५ पर्यंत जवळपास ६० एमएलटी साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित होईल. यातून अतिरिक्त ऊसाच्या समस्येसह उशीरा होणाऱ्या ऊस बिलांच्या वितरणाचा मुद्दाही संपुष्टात येईल. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळू शकतील.
इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) डिसेंबर २०१३ ते नोव्हेंबर २०१४ पासून ईएसवाय २०२२-२१ पर्यंत, साखर कारखाने, डिस्टिलरींनी इंधन वितरण कंपन्यांना (ओएमसी) इथेनॉल विक्रीतून जवळपास ५३,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. सध्याच्या ईएसवाय २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांकडून ओएमसींना इथेनॉल विक्रीतून १८,००० कोटी रुपयांहून अधिक महसुली उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या हंगामात २०२१-२२ मध्ये ९२,९३८ कोटी रुपयांच्या ऊस थकबाकीपैकी शेतकऱ्यांना १८ एप्रिल २०२२ पर्यंत जवळपास ९२,४८० कोटी रुपयांची ऊस बिले मिळाली आहेत. याप्रकारे गेल्या हंगामातील जवळपास ९९.५ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत. चालू गळीत हंगामात, २०२१-२२ मध्ये ९१,४६८ कोटी रुपयांच्या ऊस थकबाकीपैकी शेतकऱ्यांना १८ एप्रिलअखेर ७४,१४९ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. हे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. चालू हंगामात कारखाने शेतकऱ्यांना १,००,००० कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले देतील. ऊस निर्यातीत वाढ आणि इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळण्यास गती आली आहे.
(Source: PIB)