पाकिस्तानच्या जनतेवर महागाई आणि बेरोजगारीचा आसूड कोसळला आहे. आता पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने आता इतर वस्तूंच्या दरवाढीसही मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीने गव्हाचे पीठ, साखर आणि तुपाच्या किमतीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे आधीच अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना आता जनतेला पुन्हा महागाईच्या फटक्यास सामोरे जावे लागणार आहे.
याबाबत जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अर्थ आणि महसूल मंत्री शौकत तरीन यांनी समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून २ लाख टन साखरेच्या आयातीचा प्रस्ताव ठेवला. कापूस आणि तांदुळाच्या पिकासाठी डीएपी खतावर अनुदान आणि पाकिस्तानच्या व्यापार मंडळाद्वारे दोन लाख कापूस गाठी खरेदीस मंजुरी देण्यात आली. समितीने तीन आवश्यक वस्तूंच्या दरवाढीस मंजुरी दिली. यामध्ये वीस किलो पीठाचा दर ९५० रुपये, तुपाचा दर प्रती किलो २६० रुपये आणि साखरेचा दर प्रती किलो ८५ रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात ५.४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हाय स्पीड डिझेलच्या दरात २.५४ रुपये प्रती लिटरची वाढ कली आहे. केरोसिनच्या दरात १.३९ रुपये प्रती लिटर वाढ केली गेली. पाकिस्तानमध्येही सातत्याने इंधन दरवाढ केली जात आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link