सरकारने इथेनॉलवरील जीएसटी १८ वरून ५ टक्क्यांपर्यंत घटवली

103

सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच इथेनॉल उद्योगासाठी सरकारने एक चांगली उपाययोजना केली आहे.

याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (इपीबी) प्रोग्राम अंतर्गत मिश्रणासाठी इथेनॉलवरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून घटवून ५ टक्क्यांवर आणला आहे.

सरकारने इथेनॉलचा दर ६२.६५ रुपयांवरून वाढवून ६३.४५ रुपये प्रती लिटर केला आहे. सी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलचा दर सध्या ४५.६९ रुपये प्रती लिटर होता. तो आता ४६.६६ रुपये प्रती लिटर केला आहे. तर बी हेवी मोलॅसेसीसपासून इथेनॉलचा दर ५७.६१ रुपये प्रती लिटरवरुन वाढवून ५९.०८ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here