श्रीलंकेत साखर साठेबाजी विरोधात सरकारने उचलली कठोर पावले

281

कोलंबो : श्रीलंकेत साखर साठेबाजांवर सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशभरातील गोदामावर छापे टाकण्यात येत आहेत. या साठेबाजीत एका बड्या कंपनीचे नाव उघड झाले आहे. पिरामिड विल्मर कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला आहे अशी माहिती खुद्द राष्ट्रपती कार्यालयाने दिली. गोदामातून ६२०० मेट्रिक टन साखर जप्त करण्यात आली आहे. आवश्यक सेवा, सुविधांचे आयुक्त, मेजर जनरल एन. डी. एस.पी. निवुन्हेला यांनी सांगितले की, काल केलेल्या छापेमारीत २९९०० टन साखर जप्त करण्यात आली आहे.

यादरम्यान सहकारी सेवा, वितरण विकास आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री लसंथा अलगियावन्न यांनी डेली मिररशी बोलताना स्पष्ट केले आहे की बीओआय नोंदणीकृत कंपनीवर साठेबाजीचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांना, कंपन्यांना सूट देण्यात येत नाही, कंपनी बीओआयकडे नोंदणीकृत असेल तरीही तिला सूट दिली जाणार नाही. साखर साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अलगियावन्ना म्हणाले, देशात कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू राहील. ज्यांनी दुकान अथवा गोदामात तांदूळ, साखर लपवली असेल अशा त्यांच्यावर कारवाई सुरू राहील असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here