कुंडल : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम प्रारंभ चितळे उद्योग समुहाचे प्रमुख गिरीश चितळे, अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्यासह सभासद, संचालकांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळई उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नितीन नवले आदी उपस्थित होते.
यावेळी गिरीश चितळे म्हणाले, की क्रांती साखर कारखान्याने आजवर सहकारी कारखानदारीत आदर्श घातला आहे. शेतकरी, साखर उद्योगाच्या दृष्टीने हे अभिमानास्पद आहे. त्यांनी ऊस उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांचे उत्पादन कमी खर्चात वाढले आहे. चितळे व लाड कुटुंबीयांचे ऋणानुबंध चार पिढ्यांचा आहे.
अॅग्रोवनमधील वृत्तानुसार, चितळे यांनी सांगितले की, आता एक प्रकारची हरित क्रांती झाली आहे. भविष्यात अधिकाधिक इथेनॉल निर्मिती ही काळाची गरज ओळखून क्रांती कारखाना भविष्याची पावले टाकेल. इंधनाच्या दृष्टीने देशाला स्वयंपूर्ण बनवेल.’
लाड म्हणाले, गत हंगामात ३२ शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपी मागितली. ती त्यांना दिली आहे. अजूनही वाढीव दर द्यायला तयार आहे मात्र साखर, इथेनॉलचे दर वाढणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत. क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांनी संस्थेचे संस्थेचे मालक न होता कुंपण व्हावे असा मूलमंत्र आम्हाला दिला. आम्ही तो आदर्श ठेवून उद्योग चालवत आहोत.