उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली

512

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. किसान मजदूर पार्टीच्या वतीने हे उपोषण आंदोलन सुरू असून पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमरजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. खासगी डॉक्टरांनी आंदोलक शेतकऱ्यांवर उपचार केले आहेत. या उपोषण आंदोलनात शेतकरी नेते व्ही. एम. सिंह देखील सामीर होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी एफआरपीच्या थकबाकीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. यातील श्रीकृष्ण वर्मा आणि देवेंद्र सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे उपोषणस्थळी खळबळ उडाली. खासगी डॉक्टरांना बोलवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमरजितसिंह यांनी माध्यमांनी माहिती दिली. उपोषण आंदोलनाच्या स्थितीची माहिती पार्टचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांना देण्यात आली असून, तेदेखील उपोषणात सहभागी होतील, असे अमरजितसिंह यांनी सांगितले.

उपोषण आंदोलनाला तीन दिवस झाले तरी, जिल्हा प्रशासाने याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

दरम्यान, बजाज साखर कारखान्या बाहेरही ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. तेथे कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मंदीप सिंह आणि सचिव कुलदीप सिंह यांनी शेतकरी भुकबळीच्या उंबरठ्यावर आहेत. कर्जाच्या हप्त्यांसाठी बँकांनी तगादा लावला आहे. तर दुसरीकडे कारखाने उसाचे बिल द्यायला तयार नाहीत, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here