साताऱ्यात शरयू कारखान्याचा सर्वाधिक ३,१५१ रुपये दर जाहीर

सातारा : सातारा जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी ऊस दराची घोषणा केली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील शरयु अ‍ॅग्रो साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रती मेट्रिक टन ३,१५१ रुपये एकरकमी आणि विनाकपात देणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. या कारखान्याने सर्वाधिक दर दिला असून वाई-खंडाळाचे आमदार आणि ‘किसनवीर’चे चेअरमन मकरंद पाटील यांनी प्रती टन ३,००० रुपये दर जाहीर केला आहे.

सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी ३५०० रुपये प्रती टन दराची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनेची बैठक बोलावली. मात्र, तोडगा निघाला नव्हता. मात्र, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कारखान्याच्या प्रतिनिधींना दरावर तोडगा काढण्यास सांगितले होते. त्यानुसार आता कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले आहेत. यात स्वराज ग्रीन – ३१०१ रुपये, अजिंक्यतारा, सह्याद्री, जरंडेश्वर, कृष्णा, जयवंत शुगर, दत्त इंडिया, रयत अथणी – प्रत्येकी ३,१००, माण-खटाव, श्रीराम – प्रत्येकी ३०५१, ग्रीन पॉवर – ३००६, किसनवीर – ३०००, प्रतापगड आणि बाळासाहेब देसाई – प्रत्येकी २,८५० रुपये अशी उसाची पहिली उचल दर जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here