टेमघर येथे सर्वाधिक पावसाची नोंद

खडकवासला : पश्‍चिम महाराष्ट्रात धूमा़कूळ माजवलेला पावसाळा संपण्यात आता केवळ दोन आठवडे बाकी आहेत. गणेशोत्सवा दरम्यानही पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले होते. यामुळेच यंदा खडकवासला धरणातही गेल्या 30 वर्षातील विक्रमी पाउस पडला आहे. येथील टेमघर या ठिकाणी 1 जून ते 17 सप्ेटंबर या काळात सर्वाधिक म्हणजेच 4 हजार 777 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तर पानशेत येथे 3 हजार 389, वरसगाव येथे 3 हजार 3368 मि.मि. तर खडकवासला येथे 1 हजार 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुठा नदीच्या पात्रातून 1712 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तब्बल 20 वर्षांच्या इतिहासात उच्चांकी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. पानशशेत, वरसगाव, मुठा, सिंहगड खोर्‍यात अजूनही पाउस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक सुरु आहे. रायगड जिल्ह्या जवळच्या पानशेत धरणक्षेत्रात पावसाचा जारे अधिक असल्यामुळे, मोसे, आंबी, मुठा नदी व ओेढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

खडकवासला मध्ये यंदा जोरदार पाउस पडला. यामुळे धरण साखळीत गतवर्षीपेक्षा 2 टीएमसी पाणी अधिक आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा 27.19 टीएमसी म्हणजे 93.29 टक्के होता. तर यंदा शंभर टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या चोवीस तासात टेमघर येथे 5, वरसगाव येथे 3, पानशेत येथे 3, तर खडकवासला येथे 3 मिलिमीटर पाउस पडला. सध्या 1 हजार 712 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here