जीएसटी वसुलीचा उच्चांक, कोरोना आणि निर्बंधांचा परिणाम नाही

109

नवी दिल्ली : एप्रिल २०२१ मध्ये देशाच्या जीएसटीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. यामध्ये १,४१,३८४ कोटी रुपये सीजीएसटी जमा झाला असून एसजीएसटीचे कलेक्शन ३५,६२१ कोटी रुपये तर आयजीएसटीचे कलेक्शन ६८,४८१ कोटी रुपये झाले आहे. याशिवाय ९,४४५ कोटी रुपयांचा उपकर केंद्र सरकारकडे जमा झाला आहे.

देशाच्या विविध भागांमध्ये कोविड १९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतीय व्यावसायिकांनी पुन्हा एकदा रिटर्न फायलिंगच्या नियमांचे पालन न करता महिन्यात वेळेवर जीएसटी थकबाकी भरली आहे.

गेल्या सहा महिन्यात झालेल्या वसुलीच्या अनुषंगाने पाहिले तर एप्रिल २०२१ मध्ये गेल्या महिन्यातील महसुलापेक्षा १४ टक्के अधिक कर जमा झाला आहे. एप्रिल महिन्यातील देशांतर्गत देवाण-घेवाणीतील उत्पन्न (आयातीसह) गेल्या महिन्याच्या उत्पन्नापेक्षा २१ टक्के अधिक झाले आहे.

गेले सात महिने जीएसटी वसुली १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहीली आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here