आयएमएफचे अनुमान, यंदा भारतीच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ९.५ टक्के राहणार

27

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या ताज्या अनुमानानुसार भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९.५ क्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के गतीने वाढण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेत २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७.३ टक्क्यांची घसरण झाली होती.

आयएमएफच्या ताज्या वैश्विक अहवालानुसार भारतातील वाढीचा अंदाज यावर्षीच्या जुलै महिन्यातील आपल्या अनुमानाइतकाच स्थिर ठेवण्यात आला आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा अंदाज १.६ टक्क्यांनी घटविण्यात आला आहे. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी केलेल्या डब्ल्यूईओअनुसार २०२१ मध्ये जगाचा वाढीचा दर ५.९ टक्के तर २०२२ मध्ये ४.९ टक्के राहील अशी शक्यता आहे.

अमेरिकेत यावर्षी सहा टक्के आणि पुढील वर्षी ५.२ टक्के इतका वाढीचा दर राहील. चीनच्या अर्थव्यवस्थेत २०२१ मध्ये आठ टक्के तर पुढील वर्षी, २०२२ मध्ये ५.६ टक्क्यांनी वाढ होऊ शकेल. आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, जुलैच्या अनुमानाच्यातुलनेत २०२१ मध्ये जागतिक वाढीच्या दरात किरकोळ बदल करून तो ५.९ टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे. २०२२ साठी हा दर ४.९ टक्के इतका राहू शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here