एफआरपीत केलेल्या वाढीचा यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना कसलाच फायदा होणार नाही : माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन २५० रुपयांची वाढ केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार यांनी एफआरपीमध्ये सरकार ने केलेली वाढ अत्यंत कमी असल्याचे म्हटले आहे. शेट्टी म्हणाले कि, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले दर पाहता एफआरपीमध्ये अजून वाढ होणे गरजेचे आहे.

शेट्टी म्हणाले की, उसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफआरपीमध्ये वाढ करण्याची मागणी मी सन २०२१ मध्ये कृषी मूल्य आयोग व केंद्र सरकार यांच्याकडे केली होती. वास्तविक ही वाढ पुढील हंगामासाठी असणार आहे. त्यामुळे या दरवाढीचा या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही.

सध्या तोडणी वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत साखर ६० रुपये किलो असताना सरकारने निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे देशातील साखरेचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने तातडीने निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना जादा दर मिळेल. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कृषी मूल्य आयोग उसाची एफआरपी जाहीर करते. मात्र, यंदा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एफआरपी फेब्रुवारीतच जाहीर केल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here