संभल : ऊस उपलब्धतेबाबत केलेल्या सर्व्हेच्या यादीचे गावोगावी प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागण केलेल्या ऊसाच्या क्षेत्रफळाची यादीत पडताळणी करावी. जर यामध्ये एखादी त्रुटी असेल तर शेतकरी जागेवरच आक्षेप नोंदवी शकतात. साखर कारखाने आणि जिल्हा ऊस सहकारी समितीने जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्राचा सर्व्हे सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यादरम्यान शेतकऱ्याच्या नावावर कमी ऊसाची नोंद झाली असेल अथवा त्याचे नाव चुकीचे लिहिले गेले असेल तर अशा त्रुटींची दुरुस्ती केली जावी. गावातील प्रदर्शनस्थळी तातडीने याची दुरुस्ती केली जावू शकते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, असमोली साखर कारखान्याचे ऊस विभागाचे मुख्य व्यवस्थापक आझाद सिंह म्हणाले की, सर्व्हेच्या यादीतील दुरुस्तीचे काम सर्वेक्षण केलेले कर्मचारी करतील. हे काम ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहाणार आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. ऊस लागवड क्षेत्राबाबत काही त्रुटी असल्यास त्याबाबत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. सर्व्हेअर ही दुरुस्ती करतील, असे संभलचे जिल्हा ऊस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले.