इथेनॉल उत्पादनासाठी अनेक कंपन्या घेताहेत पुढाकार

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाचे आता दिसू लागले आहेत. देशातील आणि जगातील अनेक कंपन्या भारतात इथेनॉल प्लांट स्थापन करण्यास रुची दाखवत आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. केंद्र सरकारने हे चित्र बदलण्यासाठी २०१४ पासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. गेल्या सात ते आठ वर्षात देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करून ५०,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत केली आहे. भारताने या वर्षी जून महिन्यात निर्धारीत वेळेपूर्वी पाच महिने आधी देशात सरासरी १० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे.

भारताची सर्वात गतीने वाढणाऱ्या स्वच्छ इंधन ऊर्जा कंपनी नेक्सजेन एनर्जीनेही आता इथेनॉल उत्पादन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा आणि देशभरात प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. नेक्सजेन एनर्जी कंपनी इथेनॉल उत्पादनात जवळपास ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. नेक्सजेन एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. पीयूष द्विवेदी यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्या योजनांचा विस्तार करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here