संसदेत ऐरणीवर आला साखर कारखान्याच्या थकबाकीचा मुद्दा

98

सीतामढी, बिहार: खासदार सुनील कुमार पिटू यांनी संसदेमध्ये सीतामढी येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे रीगा कारखान्यांवर करोडो रुपये थकबाकी देय असल्याचा मुद्दा उठवला आहे. खासदारांनी सांगितले की, सीतामढी जिल्हा पूरग्रस्त भाग आहे आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत ऊसाची शेती आहे. जिल्ह्यामध्ये एकमेव रीगा साखर कारखाना आहे, ज्यावर वर्षांपासून शेतकर्‍यांचे करोडोंरुपये देय बाकी आहे. यामुळे कोरोना काळात शेतकर्‍यांकडे आपल्या मुलांना शिकवणे तसेच घरातील विविध समस्यांसाठी पैसे उरलेले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत. केंद्र सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या स्तरावर महत्वपूर्ण प्रयत्न करावेत अशी त्यांनी मागणी केली .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here