शेतकरी दिन मेळाव्यात गाजला थकीत ऊस बिलांचा मुद्दा

अमरोहा : जिल्हाधिकारी राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शेतकरी दिन कार्यक्रमात थकीत ऊस बिलांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्या गांभीर्याने ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्याचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या.

उसाची थकीत बिले तत्काळ द्यावीत, आगामी गळीत हंगामासाठी उसाला ४५० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर करावा, सर्व साखर कारखाने २० ऑक्टोबरपर्यंत सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी हसनपुर साखर कारखान्याची क्षमता वाढवण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. उसाची जी काही बिले थकीत आहेत, ती तातडीने दिली जावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिल्या. बिले वेळेवर न दिल्यास संबंधित साखर कारखान्यावर आवश्यक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here