मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोचला ऊस थकबाकीचा मुद्दा

हापुड, उत्तर प्रदेश: शेतकर्‍यांची करोडो रुपयांची ऊस थकबाकी भागवणे, जिल्ह्याच्या सीमा विस्तार करणे, तांदूळ खरेदी आदी मुद्यांबाबत भाजपाचे प्रादेशिक आमदार विजय पाल आढती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले. त्यांनी आग्रह केला की, समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जावे.

आमदार विजय पाल अढती यानीं सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. जिल्ह्यातील सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची जवळपास 300 करोड पेक्षा अधिक थकबाकी आहे . पैसे न भागवल्याने शेतकरी अडचणीत आहेत आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. यासाठी लवकरात लवकर दोन्ही साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांचे पैसे भागवले जावेत जेणेकरुन शेतकरी आपला उदरनिर्वाह करु शकतील.

आमदारांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये तांदूळ खरेदीही होत नाही. अशामध्ये तांदूळ शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे . जिल्ह्याच्या सीमा विस्तारासाठी शासनाकडे बर्‍याच काळापासून पस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर पास करावे. हापुड आणि मेरठ सीमेवर असणार्‍या धीरखेडा औद्योगिक क्षेत्रालाही हापुडमध्ये सामिल केले जावे. त्यांनी सांगितले की, सीमा विस्तार होणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये यूरिया आणि खतांचा पुरवठा शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात केला जावा, म्हणजे शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये. याबरोबरच विधान सभा क्षेत्रामध्ये राजकीय कन्या डिग्री कॉलेज उघडण्याचाही आग्रह केला. डिग्री कॉलेज उघडल्याने विद्यार्थ्यांना दुसर्‍या जिल्ह्यामध्ये शिक्षण ग्रहण करण्यासाठी जावे लागणार नाही.

आमदारांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यानथ यांनी आश्‍वासन दिले की, लवकरात लवकर समस्यांचे निराकरण केले जाईल . याबाबत संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक ते आदेश दिले जातील .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here