ऊस थकबाकीचा मुद्दा मंत्रिमंडळा समोर ठेवणार: मंत्री

काशीपूर : कृषी मंत्री सुबोध उनियाल जसपुर मध्ये पोचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून विभागीय योजनांची माहिती दिली. तसेच ऊस थकबाकीच्या प्रश्‍नावर त्यांनी सांगितले की, ते लवकरच ऊस थकबाकी चा मुद्दा मंत्रिमंडळा समोर ठेवतील.

रविवारी देहरादून हून जसपूर मध्ये पोचलेले कृषी मंत्री सुबोध उनियाल माजी आमदार डॉ. शैलेंद्र मोहन सिंघल यांच्या कार्यालयात आले. इथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. शेतकर्‍यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी उनियाल म्हणाले, ऊस विभाग त्यांच्याकडे नाही. शेतकर्‍यांची ही मागणी कॅबिनेटसमोर ठेवू. त्यांनी जसपूरच्या विकासासाठी माजी सीएम एनडी तिवारी यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी सांगितले की, स्थानिक जनतेला जसपूरचा विकास हवा आहे, यासाठी जसपूरचे नेतृत्व बदलावे लागेंल. गेल्या साडे तीन वर्षामध्ये जसपूर चा कोणताही विकास झालेला नाही. बाजाराला पीपीपी मोड देण्याच्या उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आता असे काहीही होणार नाही. यापूर्वीे माजी आमदार डॉ. सिंघल यांनीही शेतकरी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधीत समस्यांना कृषी मंत्र्यांना सांगितले. त्यांनी समस्यांचे निराकरण करण्याचा विश्‍वास दिला.

यावेळी नगर अध्यक्ष सुधीर विश्‍नोई, दूल्हे खां, डा सुदेश, सुरेंद्र चोहान, अंकुर सक्सेना, विकल, अनिल नागर, दीपक कुमार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here