किल्लारी कारखाना पहिला हप्ता २,६५० रुपये देणार : आमदार अभिमन्यू पवार

लातूर : किल्लारी कारखाना यंदाच्या गळीत हंगामात २ लाख टन गाळप करणार आहे. किल्लारी कारखान्याचा पहिला हप्ता २६५० देणार आहे अशी घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी किल्लारी कारखान्याला ऊस पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, पारदर्शक कारभारातून केवळ शेतकरी हिताच्या दृष्टीने किल्लारी कारखाना सुरू होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे खासगीकरणात जाणारा हा कारखाना सहकारात राहिला आहे. प्रत्यक्षात कारखाना सुरू करताना अनंत अडचणी आल्या. वैयक्तिक हमीवर पैसे जमा करीत आम्ही कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी तो सुरू करण्यात यश आले. कारखान्याच्या पारदर्शक कारभारासाठी कारखाना परिसरात ५६ सीसीटीव्ही कॅमेरे तर ६ इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवण्यात आले आहे, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली.

आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, कारखाना सुस्थितीत चालावा यासाठी अद्यावत मशनरी बसवण्यात आली असून हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार पवार यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले आहे. त्यामुळे शेतकरी व कर्मचारी यांनी हा कारखाना आपला आहे, या भावनेने सहकार्य करावे. याप्रसंगी ह. म.प. महेश महाराज माकणीकर, महंत राजेंद्र गिरी, किरण गायकवाड, संताजी चालुक्य, विजयकुमार सोनवणे, अरब अस्लम तालाबसाब, किशोर साठे, मोहनराव पाटील, किल्लारीच्या सरपंच सुलक्षणाताई बाबळसुरे, निवृत्ती भोसले, रमेश हेळंबे, शरद भोसले, हभप दतात्रय पवार गुरुजी, शोभा पवार, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा. भीमाशंकर राचट्टे, चंद्रकांत बिराजदार आदींसह शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here