बंद पडलेल्या साखर कारखान्यांची जमीन नव्या उद्योगांकडे

पटना : राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांची 2 हजार 442 एकर जमीन नव्या उद्योग निर्मितीसाठी लवकरच बिहारच्या औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकार (बियाडा) यांना हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्य सरकारने बंद केलेले साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भात पाच वेळा निविदा देवूनही निवेशक समोर आलेले नाहीत, त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

ते म्हणाले, औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या चार औद्योगिक क्षेत्रात राज्य लघु उद्योगांअंतर्गत खाजा, राईस मिल, सीप बटन व तांबे पितळ इत्यादी विविध जिल्ह्यात स्थापन असणार्‍या सात क्लस्टर मध्ये 28़83 करोड़ च्या निवेश प्रस्तावामध्ये आजपर्यंत 15़61 करोड़ चे निवेश झाले आहेत. ते म्हणाले, मुख्यमंत्री अनुसूचित जाती, जमाती उद्योग योजने अंतर्गत 4,868 उद्योजकांना 340 करोड़ पर्यंत कर्ज देण्यास मान्यता दिली आहे, ज्याअंतर्गत उद्योेजकांना 10 लाखाच्या उद्योगासाठी 50 टक्के म्हणजेच पाच लाख रुपयांचे अनुदान व पाच लाख व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here