सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली बैठक निष्फळ : उद्या चक्काजाम

मुंबई : मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आलेली निष्फळ ठरली आहे. उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

जालिंदर पाटील म्हणाले की, दोन तास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत चर्चा झाली. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे, मात्र आजच्या बैठकीत सरकार शेतकरी सोबत आहे हे वाटले नाही.

जे कारखाने थकबाकी देणार आहेत, त्या कारखान्यांना परवानगी द्यावी अशी आमची मागणी होती. सहकार मंत्री यांनी मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करणार आहोत, असे सांगितले आहे.

पाटील म्हणाले की, मागील वर्षाच काही मागू नका यावर्षी करु अस कारखानदारांचे म्हणणे आहे.मागच्या वर्षीच्या दुस-या उचलीतील ४०० रुपये आम्ही मागत आहे. शिरोली हायवे वरती आंदोलन केल जाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here