देशात यंदा मॉन्सून सामांन्य राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिमी मॉन्सून उत्तर आणि दक्षिण भारतात सामांन्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मध्य भारतात मॉन्सून सामान्य स्थितीपेक्षा अधिक असेल. याउलट पूर्वोत्तर भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी मॉन्सून पहायला मिळेल असे आयएमडीने म्हटले आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सून २०२१साठी आपला दुसरा दीर्घकालीन अंदाज वर्तवताना आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितले की देशात जून महिन्यात मॉन्सून सामांन्य राहण्याची शक्यता आहे. जेव्हा पेरणीचा हंगाम असतो तेव्हा आणि एकूणच यावर्षी मॉन्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत महापात्र म्हणाले, आम्ही चांगल्या मॉन्सूनची अपेक्षा करतो, ज्यायोगे कृषी क्षेत्राला मदत मिळेल. देशात मॉन्सूनची दीर्घकालीन सरासरी १०१ टक्के राहण्याची शक्यता आहे. यामध्ये चार टक्के अधिक अथवा कमीचा फरक होऊ शकतो.

दरम्यान, ९६ ते १०४ एलपीए मॉन्सून सामांन्य म्हटला जातो. वर्ष १९६१ – २०१० या कालावधीत देशात मॉन्सूनच्या पावसाची सरासरी ८८ सेंटिमिटर आहे. आयएमडीने दक्षिण-पश्चिम मॉन्सूनच्या पहिल्या पूर्वअनुमानात ९८ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली होती. ती सामान्य श्रेणी असते. आता पूर्वानुमान वाढवून एलपीए १०१ टक्के केले आहे. हा सामांन्यपेक्षा उच्च स्तर आहे. यंदा ४० टक्के शक्यता सामांन्य पावसाची आहे. तर २२ टक्के शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची आहे. १२ टक्के शक्यता सर्वाधिक पावसाची असून १८ टक्के शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होईल अशी असल्याचे महापात्र म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here