ऊसाचे थकलेले पैसे कमी दिल्याने मंत्र्यांनी कारखाना अधिकार्‍यांना फटकारले

134

बुलंदशहर, उत्तर प्रदेश: राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा गुरुवारी जिल्ह्यामध्ये पोचले. त्यांनी इथे लोक निर्माण विभागाच्या गेस्ट हाउस मध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा ऊस खरेदी करणार्‍या आठ साखर कारखान्यांकडून बाकी असलेल्या ऊस थकबाकी बाबत चर्चा केली, 50 टक्केपेक्षा कमी पैसे भागवल्याने कारखाना अधिकार्‍यांना मंत्र्यांनी फटकारले. तसेच नवा गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी संपूर्ण देय भागवण्याचे आदेश दिले.

राज्याचे मंत्री सुरशे राणा यांनी विभागीय अधिकार्‍यांबरोबर जिल्ह्यातील वेव साखर कारखाना, अगौताचा अनामिका साखर कारखाना, अनूपशहर चा दी सहकारी साखर कारखाना आणि साबितगढ कारखन्याशिवाय जिल्ह्याच्या ऊस शेतकर्‍यांचा ऊस खेरदी करणाऱ्या हापुडच्या ब्रजनाथपूर आणि सिम्भावली, अमरोहा आणि चंदनपूर साखर कारखान्याकडून आतापर्यंत ऊस गाळप हंगाम 2019-2020 मध्ये करण्यात आलेल्या थकबाकीची समीक्षा केली. वेव, ब्रजनाथपूर आणि सिंभावली कारखान्याकडून आतापर्यंत कमी पैसे भागवल्यामुळे ऊस मंत्र्यांनी कारखाना अधिकार्‍यांना फटकारले आणि गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी पैसे भागवण्याचे आदेश दिले. त्यांनी साखर कारखान्यांमध्ये ठेवलेल्या साखरेच्या बाबतीत माीहिती घेतली. पैसे न मिळाल्याने कारखान्यांना नोटीस देण्याच्या कारवाईबाबत डीसीओ यांच्याकडून माहिती घेतली. ऊस मंत्री सुरेश राणा यांनी विभागीय आणि कारखाना अधिक़ार्‍यांना स्पष्ट शद्बात सांगितले की, शेतकर्‍यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. त्यांनी अधिक़ार्‍यांकडून नवा गाळप हंगाम 2020-21 बाबतीतही माहिती घेतली आहे. यावेळी जिल्हा ऊस अधिक़ारी डीके सैनी सह सर्व साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here